दुचाकी पूलावर ठेवून दुचाकीस्वाराने मारली सातार्डा पुलावरून उडी ; शोधकार्य सुरू ,सदर व्यक्ती आरोस दांडेली येथील
सावंतवाडी – आरोस दांडेली येथील एका व्यक्तीने सातार्डा येथील पुलावरून तेरेखोल नदीपात्रात दुपारी उडी मारली.पूलावर मासेमारीसाठी उभे असणाऱ्या व्यक्तींनी उडी मारताना पाहिल्याने सदरची गोष्ट लक्षात आली.उडी मारणाऱ्या व्यक्तीने आपली दुचाकी पुलावर ठेवून सदरच्या व्यक्तीने उडी मारल्याने दुचाकीवरून त्याची ओळख पटली असून बाळा खोत असे नाव असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून पोलिसांनी शोध घेत असून उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते.