देवगड शिवनगर येथील श्रेया बिडये यांचे निधन
देवगड- प्रतिनिधी
देवगड शिवनगर येथील सौ. श्रेया उमेश (श्रीकांत) बिडये (५०) यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. पश्चात पती, दोन मुली, मुलगा, दोन दीर, भावजय असा मोठा परिवार आहे. देवगड अर्बन बँकेचे ज्येष्ठ लिपीक व फ्रेंडस् सर्कल- देवगडचे ज्येष्ठ सदस्य उमेश बिडये यांच्या त्या पत्नी, तर देवगड बाजारपेठेतील व्ही. आर. बिडये अँण्ड सन्स कापड दुकानाचे मालक धनंजय बिडये यांच्या त्या वहिनी होत.
