शाळेचे माजी विद्यार्थी संतोष मनोहर शेलार यांनी आपले वडील कैलासवासी मनोहर सदाशिव शेलार यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शाळा प्रवेशद्वार बांधून देत समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
कणकवली (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा शेर्पे या शाळेचे शाळा प्रवेशद्वार शाळेचे माजी विद्यार्थी संतोष मनोहर शेलार यांनी आपले वडील कैलासवासी मनोहर सदाशिव शेलार यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शाळा प्रवेशद्वार बांधून दिले .त्यांच्या या देणगीबद्दल सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे .
दरवर्षी 10 जानेवारी हा कैलासवासी मनोहर शेलार यांचा स्मृतिदिन असतो .गेले पाच वर्षें संतोष मनोहर शेलार आणि कुटुंबीय आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनी केंद्रशाळा शेर्पेला शाळेचे मुख्याध्यापक श्री दशरथ शिंगारे यांच्याशी संपर्क करून शाळेची गरज ओळखून विनामोबदला देणगी देऊन आपल्या वडिलांचा स्मृतिदिन शाळेमध्ये साजरा करत आहेत .
या उपक्रमातून एक चांगला आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवलेला आहे .केंद्रशाळा शेर्पेला पहिल्या स्मृती दिनी त्यांनी 10 जानेवारी 2022 ला रुपये 16000 / – किंमतीचा कलर प्रिंटर भेट म्हणून दिला .द्वितीय स्मृतिदिन 10 जानेवारी 2023 ला 20000 / -रुपये किंमतीचा 32 इंची टीव्ही दिला .तृतीय स्मृतिदिन 10 जानेवारी 2024 ला रुपये 27000 किंमतीचा लॅपटॉप दिला .
चौथा स्मृतिदिन 10 जानेवारी 2025ला शालेय पोषण आहार भांडी संच व मिक्सर करिता रुपये 20000 / – तर पाचवा स्मृतिदिन 10 जानेवारी 2026 ला त्यांनी रुपये 30000 / – खर्च करून शाळा प्रवेशद्वार बांधून दिले .एकूण पाच वर्षांमध्ये रु 113 000 अक्षरी रु एक लाख तेरा हजार रुपये आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा शेर्पे या शाळेकरिता योगदान दिलेले आहे . यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे यांनी विशेष सहकार्य केल्याचे संतोष शेलार आवर्जून सांगतात .
आपल्या आई -वडिलांचे मरणोत्तर त्यांची आठवण अशा प्रकारे जिल्हा परिषद शाळांना मदत अशा प्रकारे केल्यास आपल्याजिल्हा परिषदेच्या शाळांना शाळांना उर्जित अवस्था येईल अशा प्रकारचा मनोदय संतोष शेलार यांनी व्यक्त केला . आणि या विचाराने एक समाजामध्ये नवीन प्रेरणा निर्माण केलेली आहे .त्यांचा विचार खूप प्रेरणादायी आहे .पाच वर्षांच्या या त्यांच्या उपक्रमानंतर त्यांनी स्मृतिदिन कार्यक्रम थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शाळेच्या वतीने संतोष शेलार उभयतांचा शाल , श्रीफळ , गुलाबपुष्प व शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा प्रतिकृती देऊन सन्मान करण्यात आला .
याप्रसंगी शुभ्रा सावंत व श्रावणी पवार या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली . मार्गदर्शन पर मनोगते – दशरथ शिंगारे मुख्याध्यापक तथा पदवीधर शिक्षक ,अशोक कांबळे माजी विद्यार्थी ,स्मिता पांचाळ सरपंच शेर्पे यांनी व्यक्त केले.निशा गुरव माजी सरपंच शेर्पे यांनी कार्यक्रमासाठी बाहेरगावी असल्यामुळे फोन संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या .
कार्यक्रम प्रसंगी गावचे सरपंच स्मिता पांचाळ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यविजय शेलार ,शाळेचे मुख्याध्यापक तथा पदवीधर शिक्षक दशरथ शिंगारे ,माध्यमिक विद्यालय शेर्पे मुख्याध्यापक हिदायत अत्तार पोलीस पाटील विनोद शेलार, माजी विद्यार्थी व प्रतिष्ठीत ग्रामस्थ – अशोक कांबळे , सुरेश शेलार , सदानंद शेलार , धनाजी शेलार शाळा व्यवस्थापन समिती सदस्य -जान्हवी सावंत ,वैष्णवी पवार, साक्षी तेली ,पालक – जान्हवी चव्हाण ,यासीन जैतापकर , रमीजान रमदुल ,मानसी शेलार ,प्रज्ञा शेलार ,अंगणवाडी सेविका सरिता पाताडे ,मदतनीस -लता पांचाळ , नुतन मुख्याध्यापक -वंशिका म्हाडेश्वर ,पदवीधर शिक्षक सत्यवान केसरकर ,उपशिक्षक तुषार तांबे आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ शिंगारे यांनी केले .संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन -तुषार तांबे यांनी केले .आभार प्रदर्शन वंशिका म्हाडेश्वर यांनी केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक व विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली . शाळा प्रवेशद्वार बांधकाम सदाशिव पांचाळ , मनिष शेलार यांनी केले .
