माझ्या सामाजिक कार्याची पोचपावती १०० टक्के मिळणार! – सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली | कणकवली शहराचे क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळविणारे यंगस्टार मंडळ उभ्या महाराष्ट्रात कबड्डीच्या माध्यमातून पोहोचले आहे. या मंडळाचा आपण अध्यक्ष आहे याचा सार्थ अभिमान आहे हे करीत असतानाच शासकीय रुग्णालयात येणाऱ्यांना मदत, तातडीने रक्त सुविधा पुरविणे रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, एखाद्या कुटुंबांच्या बाबतीत वाईट घटना घडल्यास सर्वप्रथम मदतीला धावण्याचे काम आपण सातत्याने केले. यात कोणत्याही प्रकारे स्वार्थी भावना न ठेवता एक सामाजिक कार्य आपण सुरु ठेवले आहे.गेली ३० वर्षांहून अधिक काळ मी खासदार नारायण राणेंसोबत काम करीत आहे.निवडणुकीच्या निमित्ताने माझ्या प्रभाग नं. १४ मधील मतदार माझ्या कामाची पोचपावती देतील असे सांगताना मला १०० टक्के खात्री असल्याचे प्रभाग. १४ चे भाजप उमेदवार सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे यांनी सांगितले.

यंगस्टार मित्रमंडळातर्फे गेली अनेक वर्ष राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असलेल्या कबड्डी स्पर्धा भरविल्या जातात. त्यामुळे क्रीडा क्षेत्राची शान उभ्या महाराष्ट्रभर आहे. अध्यक्ष म्हणून काम करीत असताना येथे नवोदित खेळाडूंना अशा स्पर्धेतून इर्षा निर्माण होते व त्यातून संधी मिळते. याचबरोबर या मंडळाच्यावतीने विविध सांस्कृतिक-सामाजिक उपक्रम राबविले जातात, याचाही मला अभिमान आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर दरवर्षी माधी जयंती उत्सव साजरा होतो. नवसाला पावणारा गणपती अशी खात्री असल्याने गेल्या काही वर्षांत या उत्सवाला महत्त्व प्राप्त आले आहे. या मंडळाचा मी संस्थापक आहे. येथेही समाजकार्याच्या माध्यमातून मी भाविकांची सेवा करतो. तर मंडळाच्या माध्यमातून अनेक
सांस्कृतिक उपक्रम राबविले गेले. आपण शहरातील शाळा नंबर ३ आणि शाळा नंबर ५ येथे निरंजन डावखरे यांच्या फंडातून संगणक मंजूर करून दिले. तसेच रक्तदान करण्यासोबतच गरजूंसाठी सातत्याने रक्त उपलब्ध करून देण्यात आपला नेहमीच हातभार असतो.

गोर-गरीब, गरजू रुग्णांवर उपचार करताना त्यांना आपल्या ओळखीचा फायदा होईल.त्या पद्धतीने सेवा करणे हे तर माझे अखंडपणे सुरू आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांच्यामुळे मला उपजिल्हा रुग्णालयात दक्षता समितीवर घेण्यात आले. त्यामुळे गेल्या काही वर्षांत येथे येणाऱ्या रुग्णांना सेवा मिळावी, यासाठी सातत्याने मी प्रयत्नशील असतो. गरजूंनी दिलेले आशीर्वाद हिच माझ्यासाठी मोठी शिदोरी आहे. हे आशीर्वाद माझ्या निश्चित कामी येतील, याची मला खात्री आहे.

मी प्रभाग १४ मधून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहे. येत्या पाच वर्षांत या भागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मी विकासाचा तुम्हाला शब्द देत आहे या भागात ज्येष्ठांसाठी विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण उपलब्धतेसाठी आपला प्रयत्न असणार आहे. पुढील पाच वर्षांत या प्रभागाचा विकासात्मकदृष्ट्या चेहरा मोहर बदलण्याचा शब्द आपण देत आहे. आपल्या सर्वांच्या प्रेम आशीर्वादामुळेच या प्रभागातून आपण यावेळी १०० टक्के विजयी होणार असल्याचेही‌ अण्णा कोदे म्हणाले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *