कणकवली (प्रतिनिधी)
कणकवली शहरातील आधार सेवा केंद्र बनली ‘निराधार ‘ ; केवळ एकच केंद्र सुरू; नागरिकांना सोसावा लागतोय त्रास
कोणत्याही शासकीय कामकाजासाठी आधार कार्ड हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो मात्र कणकवली शहरात आधार सेवा देणारे केवळ एकच केंद्र सद्यस्थितीत सुरू असल्याने आधार विषयक कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कणकवली तहसील कार्यालयातील एकमेव आधार सेवा केंद्र सद्यस्थितीत सुरू आहे. या केंद्रावर नागरिकांना चांगली सेवा मिळत असली तरी गर्दीला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे गैरसोय होत आहे.
