कुणकेश्वर महाशिवरात्रीला महादेवाच्या दर्शनासाठी येणार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; आंगणेवाडी भराडी देवीचे घेणार दर्शन
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २६ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून सकाळी ११ वा. ते श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी येणार आहेत. तसेच दुपारी १ वा. ते मालवण – आंगणेवाडी येथील भराडीदेवी मंदिर येथे दर्शनासाठी जाणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २६ रोजी सकाळी १० वा. मुंबई विमानतळावरून शासकीय विमानाने चिपी विमानतळ (ता. वेंगुर्ला) येथे प्रयाण, १०.३० वा. चिपी विमानतळ येथे आगमन, तेथून हॅलिकॉप्टरने डॉ. बोरफळकर यांच्या सरिता हॉस्पिटलनजीक नंदकिशोर जोशी यांच्या जागेवरील हॅलिपॅड (ता. देवगड) येथे प्रयाण, १०.४५ वा. नंदकिशोर जोशी यांच्या जागेवरील हॅलिपॅड येथे आगमन व मोटारीने कुणकेश्वर मंदिर येथे प्रयाण, ११ वा. कुणकेश्वर मंदिर येथे दर्शन व राखीव, सकाळी ११.३० वा. मोटारीने माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण, ११.४५ वा. रवींद्र फाटक यांच्या निवासस्थान येथे राखीव, दुपारी १२.१५ वा. मोटारीने डॉ. डॉ. बोरफळकर यांच्या सरिता हॉस्पिटलनजीक नंदकिशोर जोशी यांच्या जागेवरील हॅलिपॅड येथे प्रयाण, १२.३० वा. हॅलिकॉप्टरने आंगणेवाडी येथे प्रयाण, १२.४५ वा. आंगणेवाडी हॅलिपॅड येथून मोटारीने भराडीदेवी मंदिराकडे प्रयाण, दुपारी १ वा. भराडी देवी मंदिर दर्शन व राखीव, १.३० वा. मोटारीने आंगणेवाडी हॅलिपॅड येथे प्रयाण, १.४५ वा. हॅलिकॉप्टरने चिपी विमानतळ येथे प्रयाण, दुपारी २ वा. चिपी विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण असा दौरा होणार आहे.