जागतिक पाणथळ दिनानिमित्त संवर्धन कार्यक्रम आणि कांदळवन सफर

 

 

देवगड (प्रतिनीधी)

जागतिक पाणथळ दिनानिमित्त संवर्धन कार्यक्रम आणि कांदळवन सफर

NCC युनिट, उन्नत भारत अभियान कक्ष आणि वनस्पती शास्त्र विभाग यांनी महाराष्ट्र राज्य वनविभाग यांच्यासह आज तारामुंबरी येथे संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पाणथळ जागेमधील अविघटनशील कचरा गोळा करण्याचे काम NCC cadets आणि विद्यार्थ्यांनी केले. तसेच कांदळच्या काही प्रजातीचे रोपण करण्यात आले. यावेळी प्रा. नागेश दप्तरदार आणि वन विभागाच्या वतीने पूजा लुटे यांनी पाणथळ जागांचे महत्व विषद केले. कांदळवने या महत्वाच्या पाणथळ जागांविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती मिळण्यासाठी श्री. लक्ष्मण तारी यांनी कांदळवन सफर घडवून आणली आणि कांदळाच्या विविध प्रजाती, अनेकविध पक्षी दाखवून उत्तम मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे यांचे मार्गदर्शनाखाली लेफ्ट. सुनेत्रा ढेरे, डॉ. नितीन वळंजू आणि प्रा. गुरुप्रसाद घाडी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *