वैभववाडी तालुक्यातील नावळे गावचे रहिवाशी दशरथ (बब्या) भगवान गुरखे यांचे शुक्रवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मुळ गाव नावळे ( वैभववाडी) येथे शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे . त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा असा परिवार आहे.