देवगड- प्रतिनिधी
कॉलेज युवती छेडछाड प्रकरणातील संशयितांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई करा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी केली देवगड पोलीस निरीक्षकाकडे मागणी
देवगडमध्ये घडलेल्या युवती छेडप्रकरणातील संशयित आरोपी हे शासनाच्या विविध खात्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे संशयित आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची माहिती शासनाच्या संबंधित विभागांना देण्यात यावी. जेणेकरून संशयितांवर कायमस्वरुपी निलंबनाची कारवाई व्हावी. कोकणामध्ये देवगड तालुक्यात घडलेली ही पहिलीच घटना असून दुर्दैवी आहे. मात्र, संशयितांना कोणीही पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्याकडे केली.
