कॉलेज युवती छेडछाड प्रकरणातील संशयितांना  पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई करा  युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी केली देवगड पोलीस निरीक्षकाकडे मागणी

देवगड- प्रतिनिधी

कॉलेज युवती छेडछाड प्रकरणातील संशयितांना  पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई करा  युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी केली देवगड पोलीस निरीक्षकाकडे मागणी

देवगडमध्ये घडलेल्या युवती छेडप्रकरणातील संशयित आरोपी हे शासनाच्या विविध खात्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे संशयित आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची माहिती शासनाच्या संबंधित विभागांना देण्यात यावी. जेणेकरून संशयितांवर कायमस्वरुपी निलंबनाची कारवाई व्हावी. कोकणामध्ये देवगड तालुक्यात घडलेली ही पहिलीच घटना असून दुर्दैवी आहे. मात्र, संशयितांना कोणीही पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्याकडे केली.

 

देवगड येथे युवती छेड प्रकरणातील गुन्ह्याची माहिती जाणून घेण्यासाठी श्री. टेंबुलकर यांनी देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पोलीस निरीक्षक श्री. देवकर यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरज घाडी, व्यापार उद्योग सेलचे जिल्हाध्यक्ष तुषार भाबल, दीपक पाडावे आदी उपस्थित होते. यावेळी श्री. टेंबुलकर यांनी पोलीस निरीक्षक श्री. देवकर यांना निवेदन दिले. यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री. टेंबुलकर म्हणाले, राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. मुली सुरक्षित नाहीत. असा प्रकार देवगडमध्येही घडला असून ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

त्यामुळे या घटनेतील संशयितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. सध्या बदलापूरचे प्रकरण वेगळ्या वळणावर गेले असून या प्रकरणातील आपल्या लोकांना वाचविण्यासाठी राज्यातील सत्ताधारी, गृहमंत्री करीत आहेत. असा प्रयत्न देवगडच्या घटनेत होऊ नये, यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने देवगड पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन युवती छेड प्रकरणातील सर्व संशयितांवर कठोर शिक्षा करण्याबाबत मागणी केली आहे. यामध्ये कोणताही राजकीय हेतू, हस्तक्षेप ठेऊ नका, अशी विनंतीही आम्ही पोलीस निरीक्षकांना केली आहे. संशयितांवर योग्य ती कठोर कारवाई न झाल्यास काँग्रेसच्यावतीने आक्रमक भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही श्री. टेंबुलकर यांनी दिला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *