देवगड जामसंडे शहरात महिलांची १२ लाख ७२ हजार ४०० रुपयांची फसवणूक ; संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात

0 minutes, 0 seconds Read

देवगड : प्रतिनिधी

देवगड जामसंडे शहरात महिलांची १२ लाख ७२ हजार ४०० रुपयांची फसवणूक ; संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात

दर महिना उत्तम परतावा देणारी स्किम असल्याचे आमिष दाखवुन देवगड जामसंडे शहरातील पाच महिलांची १२ लाख ७२ हजार ४०० रूपयांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी देवगड पवनचक्की येथील श्रध्दा प्रकाश मोंडकर उर्फ आकांक्षा अतुल धुरी (३६) या संशयित महिलेविरूध्द देवगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फसवणुकीचा हा प्रकार या कालावधीत घडला.संशयित महिलेला देवगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या घटनेने देवगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

देवगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, संशयित श्रध्दा मोंडकर हिने दिनांक २२ सप्टेंबर २०२३ ते ५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत देवगड जामसंडे शहरातील पाच महिलांची सुमारे १२ लाख ७२ हजार ४०० रूपयांची आर्थिक फसवणुक केली असून याबाबत देवगड पोलिस स्थानकात प्रशांत राऊत यांनी तक्रार दिली.या तक्रारीमध्ये मोंडकर हिने २२ सप्टेंबर २०२३ ते ५ फेब्रुवारी २०२४ रोजी या कालावधीत देवगड जामसंडेमधील एकूण पाच महिलांकडून उत्तम परतावा देणारी स्कीम असल्याचे आमिष दाखवून शेअर ट्रेडिंग करिता रक्कम घेतली ही रक्कम एकूण १२ लाख ७२हजार ४०० रूपये असून पाचही महिलांनी तिच्याकडे शेअर ट्रेडिंग करिता एजंट म्हणून सोपविलेल्या रकमेची मागणी केली मात्र त्यांना वेगवेगळ्या सबबी सांगून दिलेली रक्कम देण्याचे टाळले तसेच मुळ मुद्दल व व्याजही परत न करता आर्थिक फसवणुक केली असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

या तक्रारीवरून पोलिसांनी श्रध्दा प्रकाश मोंडकर हिच्याविरूध्द भादवि कलम ४०९, ४०६,४२० व महाठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम १९९९ कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.संशयित महिलेला देवगड पोलिसांनी ताब्यात घेतले असून या गुन्ह्याचा तपास पोलिस निरिक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक संतोष भालेराव करीत आहेत.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *