देवगड (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंचायत समिती देवगड यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यात दिनांक २० डिसेंबर रोजी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत देवगड तालुक्यातील सर्व शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात येणार आहे.
देवगड तालुका पर्यटन तालुका म्हणून ओळखला जात असल्याने स्वच्छता व स्वच्छतेबाबत जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने या महास्वच्छता मोहिमेत सर्व
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत देवगड तालुका स्वच्छ, सुंदर व पर्यटकांना आकर्षक बनविण्यासाठी हे महास्वच्छता अभियान उपयुक्त ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
