Oplus_16908288

देवगडमध्ये २० डिसेंबरला श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम 

देवगड : श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत गाडगे महाराज परिट समाज सेवा संघ, देवगड तर्फे शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पुण्यतिथी सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीर्थ-प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

सकाळी १० ते ११ या वेळेत श्री संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, आरती व तीर्थ-प्रसाद कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १२ ते १ या वेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वाटप तसेच स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन कार्यक्रम होणार असून यासाठी मार्गदर्शक म्हणून सौ. स्वाती आरोलकर-कोचिंग सेंटर, शिरगाव, देवगड येथील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.

दुपारी १ ते २.३० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी ३ ते ५ या वेळेत लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम रंगणार आहेत. सायंकाळी ७ वाजता संगीत सुमधुर भजन कार्यक्रमाने या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता होणार आहे.

हा संपूर्ण कार्यक्रम श्री. जगन्नाथ पु. हळकर, मु. पो. ता. देवगड (साईनावाडी) येथे आयोजित करण्यात आला असून श्री संत गाडगे महाराजांच्या विचारांचा प्रसार व समाजात सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *