वैभववाडी (प्रतिनिधी)
अग्निवीर योजनेअंतर्गत संपन्न होत असलेल्या भरतीच्या पुर्वतयारीसाठी वैभववाडी येथे प्रशिक्षण शिबिर बुधवार दि . १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक १० वा. स्थळ-आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी येथे आयोजित करण्यात आले आहे.
भारतीय सैन्यदल, अग्निविर व पोलिस भरतीसाठी पात्र व इच्छूक असलेल्या सर्व उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वैभववाडी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था सचिव प्रमोद रावराणे यांनी केले आहे.
