समाजभूषण पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांच्या संकल्पनेतून संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीने भजनी बुवा आणि भजनी मंडळ सदस्यांना सुटिंग ड्रेस भेट देण्यात आले. संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे शारदीय नवरात्रौत्सव चे आयोजन शिरवल खासकीलवाडी येथे करण्यात आले आहे.
शिरवल येथील नवरात्रौत्सव मध्ये भजनी बुवा आपल्या भजनी मंडळींसह देवीच्या चरणी आपली कला सादर करतात. या भजनी कलाकारांचा सन्मान करण्यासाठी संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीने भजनी बुवांसह सर्व भजनी मंडळींना सुटिंग ड्रेस मटेरियल भेट देण्यात आले. भजनी बुवा श्रीकांत शिरसाट, तबलजी अमोल पांचाळ यांसह सर्व भजनी मंडळींना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संदीप चौकेकर मित्रमंडळाचे श्रीकृष्ण यादव, माजी सरपंच मनोज राणे, विजय चौकेकर, अरुण चौकेकर, गुरुनाथ चौकेकर, तेजस चौकेकर, किरण, चौकेकर, हर्ष यादव, विकास मांडवकर, शंकर लाड, सचिन लाड, राजाराम दळवी, साहिल गावडे, रामा गोळवणकर, हर्षद राणे, राहुल राणे तातोबा सावंत आदी उपस्थित होते.