पाणंद, रस्त्याच्या तालुक्यातील मोजणीला मळेवाड गावातून सुरुवात

सावंतवाडी (प्रतिनिधी)

महाराष्ट्र शासनाकडून सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत गावातील सार्वजनिक पायवाटा,रस्ते,त्याचप्रमाणे पाळंद ,ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेले सार्वजनिक रस्ते मोठ्या प्रमाणात सातबारा मध्ये किंवा गाव नकाशामध्ये कुठेही नोंदणी नसल्याचे आढळून येते यामुळे रस्ते पायवाट अडवण्याचे प्रकार वाढले असल्याने शासनाने अशा रस्त्यांची मोजमाप करून त्याची भुमिअभिलेख व कडून रीतसर मोजणी करून असे रस्ते पायवाटा या गाव नकाशा मध्ये अधिकृतरित्या नमूद करण्याकरिता मोहीम आखली आहे.

सावंतवाडी तालुक्यातील सार्वजनिक रस्ते पायवाटा व पाळंद यांच्या रेखांकनाच्या मोहिमेला मळेवाड गावात सुरुवात करण्यात आली. मळवाड गावातील प्राधान्य क्रमाने पाच रस्ते यावेळी रेखांकन करण्यात आले. उर्वरित रस्त्यांचे रेखांकन लवकरात करण्यात येणार असल्याची माहिती भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी उप अधीक्षक विनायक ठाकरे, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक, महेश शिरसाठ, ग्रामपंचायत अधिकारी भालचंद्र सावंत,भू कर मापक गोविंद गवस, विश्वदीप हवालदार, विक्रम चौगुले, तलाठी अनुजा भास्कर उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *