कणकवली (तुळशीदास कुडतरकर)
कणकवलीत शिक्षक समितीची बैठक संपन्न ; नवे पदाधिकारी निवडले, वर्धापन दिनाचे नियोजन
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कणकवली तालुका शाखेची कार्यकारिणी सभा काल सायंकाळी तालुका अध्यक्ष श्री. सुशांत मर्गज यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. सरचिटणीस श्री. निलेश ठाकूर यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त २२ जुलै रोजी २३ आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाईल. तसेच, १९ जुलै रोजी समितीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
सभेत श्री. संतोष राणे यांची जिल्हा संघटकपदी, श्री. सुभाष सहदेव गावकर यांची तालुका कार्यालयीन चिटणीसपदी, तर श्री. प्रवीण कुबल यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली. हे जिल्हास्तरीय पद जिल्हा कार्यकारिणीच्या अंतिम मंजुरीनंतर निश्चित होतील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या निर्णयामुळे समितीच्या कार्यात अधिक गती येईल, अशी अपेक्षा आहे.
