घाडीगांवकर सेवा समाज संस्था, मुंबई,सिंधुदुर्ग विभागातर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

0 minutes, 2 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

 

घाडीगांवकर सेवा समाज संस्था, मुंबई,सिंधुदुर्ग विभागातर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

 

रविवार १३ जुलै रोजी कणकवली मातोश्री मंगल कार्यालयात होणार गुणगौरव 

क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज संस्थाच्या सिंधुदुर्ग विभागातर्फे सन २०२४-२५ रविवार दि. १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ठिक १०.०० वा.मातोश्री मंगल कार्यालय शिवाजी चौकानजीक ,कणकवली येथे संपन्न होणार आहे.

      संस्थेतर्फे घाडीगांवकर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सभासदांचा सन्मान सोहळा होणार आहे. संस्था सभासद पाल्य सन २०२४-२५ दहावी परीक्षेमध्ये ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त गुण, बारावी परीक्षेमध्ये ६० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण, पूर्व उच्च प्राथमिक, पुर्व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक विदयार्थी तसेच पदवीधर, उच्च पदवीधर, UPSC, MPSC, राज्य स्तरीय व राष्ट्रस्तरीय स्पर्धेत यश मिळविलेल्या विविध स्पर्धेतील गुणगौरव होणार आहे. तरी संस्था सभासदांनी आपल्या पाल्यांची व संपर्कात असणार्या विद्यार्थ्यांची नावे ११ जुलै २०२५ पर्यंत सूर्यकांत महादेव घाडीगांवकर ,अध्यक्ष ,सिंधुदुर्ग विभाग (मो.क्र. 9422967374 ),प्रदीप घाडी,सचिव, सिंधुदुर्ग विभाग( मो.क्र.9757174528) यांच्याजवळ नोंदवावी असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *