विभागीय स्‍तरावर संकेत यमगर यांची उत्‍कृष्‍ट तहसिलदार म्हणून  निवड

0 minutes, 1 second Read

देवगड (प्रतिनिधी) १४ ऑगस्ट २०२४

 

विभागीय स्‍तरावर संकेत यमगर यांची उत्‍कृष्‍ट तहसिलदार म्हणून  निवड

 

विभागीय स्‍तरावर संकेत यमगर यांची उत्‍कृष्‍ट तहसिलदार म्‍हणून जिल्‍हाधिकरी यांच्‍याकडून निवडकरण्‍यात आल्‍याने देवगड तहसिलदार कर्मचारी वर्गात उत्‍साह निर्माण झाल्‍याचे दिसून येत आहे. १५ ऑगस्‍ट रोजी महसूल दिनाच्‍या पंधरावडा सांगता कार्यक्रमाचे औचित्‍य साधून जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात त्‍यांना सन्‍मानित केले जाणार आहे.

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात दोडामार्ग तहसिलदार म्‍हणून संकेत यमगर यांनी कामकाज पाहिले आहे. या कालावधीत लोकाभूमिक कामकाज करताना कर्मचारी वर्गाच्‍या देखील समस्‍या जानून घेत महूसल विभागाला साजेसे कामकाज केले होते. याची दखल जिल्‍हाधिकारी यांनी घेत महसूल दिनाचे औचित्‍य साधून तहसिलदार यमगर यांची उत्‍कृष्‍ट तहसिलदार म्‍हणून निवड केली आहे. लोकसभा निवडणूक कालावधीत देवगड तहसिलदार म्‍हणून यमगर यांनी पदभार स्विकारलेला आहे. देवगडच्‍या जनतेच्‍या समस्‍यांबाबत ही त्‍यांची तत्‍परता देवगड तालुका वासियांना भावली आहे. या निवडीबदृल संकेत यमगर यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *