आठ दिवसात जाहीर माफी मागा ; अन्यथा तिरडी आंदोलन करणार – महेश सारंग

0 minutes, 1 second Read

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

 

आठ दिवसात जाहीर माफी मागा ; अन्यथा तिरडी आंदोलन करणार – महेश सारंग

 

कुडाळ येथील शिवसेनेचा कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री भरत गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री, भाजपचे खास. नारायण राणे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झालेत. येत्या आठ दिवसांत त्यांनी जाहीर माफी न मागितल्यास शिवसेना कार्यालयासमोर तिरडी आंदोलन करू असा इशारा भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी दिला आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. सारंग म्हणाले, मंत्री भरत गोगावले यांनी खासदार नारायण राणे यांच्याविषयी अपमानास्पद विधान केलं. त्यांचा आम्ही निषेध करतो. श्री. राणे यांची राजकीय कारकीर्द अपुऱ्या माहितीतून ते सांगत आहे. शाखा प्रमुख, माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशा पदांवर राहिलेल्या व्यक्तीवर बोलताना त्यांनी भान ठेवून बोललं पाहिजे होत. महायुतीत आहोत याचेही भान त्यांनी राखल नाही. राणेंवर केलेल्या या विधानामुळे भाजपचे कार्यकर्ते नाराज झालेत. सिंधुदुर्ग जिल्हा घडविण्यात नारायण राणेंचा मोठा वाटा आहे. कोकणच्या विकासासाठी त्यांचे योगदान आहे. राज्यभर त्यांनी आपली ताकद निर्माण केली असताना वादग्रस्त वक्तव्य करून मिठाचा खडा मंत्री गोगावले यांनी टाकला आहे. त्यांचा आम्ही निषेध करत आहोत. मंत्री गोगावले यांनी माफी नाही मागितली तर शिवसेना कार्यालयासमोर तिरडी आंदोलन करू असा इशारा श्री. सारंग यांनी दिला. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी समज द्यावी व जाहीर माफी मागण्यास सांगावी असंही आवाहन केलं.

तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ७० टक्के जागा लढण्याच वक्तव्य ते करत आहेत. पण, अशी वादग्रस्त वक्तव्ये करुन ते शक्य होणार नाही. भाजपची ताकद जिल्ह्यात आहे. त्यामुळे कार्यकर्ते स्वबळावर लढ्यास इच्छुक आहेत. महायुतीच काम आम्ही या आधी केलं आहे. त्यामुळे काल वक्तव्य करताना मंत्री गोगावलेंना आमदार दीपक केसरकर यांनी देखील रोखल पाहिजे होत. तर, निलेश राणे हे शिवसेनेचे नेते आहेत. ते योग्य ती माहिती त्यांच्या नेत्यांना देतील असं ते म्हणाले.

          दरम्यान, नारायण राणे कॉग्रेसचे आमदार असताना विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ वर्षांपूर्वी वाचलेल्या यादी बाबत विचारलं असता श्री सारंग म्हणाले, विधानपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी कोणती यादी वाचलेली याची मला कल्पना नाही. त्यामुळे त्याची माहिती घेऊन बोलेन असे सांगितले. तसेच महायुती की स्वबळ यासंदर्भात पक्षाचा निर्णय आम्हाला मान्य असेल. मात्र, सर्वसामान्य कार्यकर्ता हा स्वबळासाठी आग्रही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी नगरसेवक गुरु मठकर, उदय नाईक, भाजपचे मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, मधुकर देसाई, उमेश पेडणेकर, अमित गौंडळकर, नागेश जगताप आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *