समाजसेवक संदीप चौकेकर आणि प्राणजीवन सहयोग संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली (तुळशीदास कुडतरकर)

समाजसेवक संदीप चौकेकर आणि प्राणजीवन सहयोग संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी

जिल्ह्यातील पहिली ते चौथी पर्यंत शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप

प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल, सिंधुदुर्गच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बालवाडी, अंगणवाडी आणि पहिली ते चौथी पर्यंत च्या शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप करण्यात येत आहे.याचा शुभारंभ सोमवारी २३ जुलै रोजी कणकवली विद्यामंदिर येथे करण्यात आला.

श्री.संदीप चौकेकर यांनी आपली आई श्रीमती राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ते चौथी पर्यंत अनेक प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप सुरु केले विद्यामंदीर प्रशालेच्या बालवाडी अंगणवाडी आणि पहिली ते चौथी पर्यंत च्या ४००‌ विद्यार्थ्यांना प्राण जीवन सहयोग संस्थांच्या वतीने आज मोफत रेनकोट वाटप करण्यात आले.संस्था अध्यक्ष श्री.संदीप चौकेकर यांनी छोट्या विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करुन शुभारंभ केला.यावेळी छोट्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

      यावेळी डॉ. राजश्री साळुंखे चेअरमन शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली, श्री विजयकुमार वळंजु सचिव,डॉ. पी. जे. कांबळे मुख्याध्यापक विद्यामंदिर हायस्कूल कणकवली , श्री ए. व्ही. वनवे पर्यवेक्षक विद्यामंदिर श्री. प्रसाद राणे, क्रीडा अधिकारी शीतल शिंदे श्री. राहुल गायकवाड, श्री. डी. पी. तानवडे,सौ. करमळकर मॅडम मुख्याध्यापक विद्या मंदिर प्राथमिक विभाग, श्री राजेंद्र तवटे यांच्यासह प्राण जीवन सहयोग संस्था ,शिरवल सिंधुदुर्ग,संस्थापक अध्यक्ष ,संदीप चौकेकर,सचिव ,सचिन धुरी,तालुका प्रतिनिधी:- प्रशांत गावडे, सदस्य:- श्रीकृष्ण यादव,भूषण धुरी,अरुण चौकेकर,मनीष परब,,ऋषिकेश धुरी,अनिप सावंत, विभाकर पालव,राजेश गुप्ता आदी उपस्थित होते.

यावेळी विद्यामंदिर प्रशालेच्या वतीने संदीप चौकेकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.राजश्री साळुंखे चेअरमन शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली, बोलताना म्हणाल्या की,प्राण जीवन सहयोग संस्था शिरवल, सिंधुदुर्ग ने जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत मदतीचा हात दिला आहे.संस्थेचे हे काम कौतुकास्पद आणि स्तुत्य आहे .संदीप चौकेकर हे शाळेचे माजी विद्यार्थी असुन त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करुन शाळेप्रती असलेली आत्मीयता आणि बांधिलकी जोपासली आहे .त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा.असे आवाहन केले.

यावेळी प्राण जीवन सहयोग संस्था शिरवल, सिंधुदुर्ग चे अध्यक्ष संदीप चौकेकर म्हणाले की,मी विद्यामंदिर प्रशालेचा माजी विद्यार्थी आहे.या शाळेने आणि शिक्षकांनी मला घडविले आहे.शाळेप्रती मला आत्मियता आणि नितांत आदर आहे.समाजाचे देणे लागतो या भावनेतून आपण शैक्षणिक साहित्य वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करत आहे.

यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.आणि प्राण जीवन सहयोग संस्थेला शुभेच्छा दिल्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *