देवगडमधील तेजस देशपांडे यांचा भाजपा प्रवेश, पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

0 minutes, 0 seconds Read

कणकवली (प्रतिनिधी)

देवगडमधील तेजस देशपांडे यांचा भाजपा प्रवेश, पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

       

          देवगडमध्ये वाहतूक सेवा आणि समाजसेवेत मोलाची भूमिका बजावणारे नामवंत समाजसेवक तेजस देशपांडे यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री तसेच बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.

रुग्ण सेवा ही समाजसेवा मानून अनेक वर्षे कार्यरत असलेले तेजस देशपांडे हे आपल्या सेवाभावी कामासाठी ओळखले जातात. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती स्नेहलता देशपांडे, संदीप साटम, संदीप मेस्त्री बंड्या नारकर आणि अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

तेजस देशपांडे यांच्या प्रवेशामुळे देवगड व सिंधुदुर्गातील युवा वर्ग भाजपाकडे आकर्षित होण्यास मदत होईल, असे मानले जात आहे. सर्वसामान्य नागरिक आणि रुग्णसेवा या क्षेत्रात नामदार नितेश राणे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे आम्ही भाजपामध्ये प्रवेश केला असल्याचे तेजस देशपांडे यांनी सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *