बांदा येथील रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

0 minutes, 1 second Read

 

बांदा (मंगल कामत) १४ ऑगस्ट २०२४

 

बांदा येथील रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद 

 

बांदा येथिल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री विठ्ठल मंदिर बांदा आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान (शाखा सावंतवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. मंडळ कार्यकर्ते, व्यापारी, युवक तसेच महिलांनी सहभागी होत ५२ दात्यांनी रक्तदान केले. ओरोस येथिल रक्तपेढीने रक्त संकलनाचे काम केले.
     बांदा श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी पोलीस निरीक्षक विकास बडवे, सिंधु रक्तमित्रचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, उपसरपंच बाळु सावंत, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगांवकर, मंडळाचे अध्यक्ष अनय स्वार, उपाध्यक्ष आबा धारगळकर, सचिव दादा पावसकर, खजिनदार विठ्ठल वाळके, राजेश विरनोडकर, सिंधु रक्तमित्रचे विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, निलेश मोरजकर, सिद्घार्थ पराडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांचा रक्तदान क्षेत्रातील योगदानाबद्दल मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, रुपाली शिरसाट यांचेसह अनेक मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.मान्यवरांचे स्वागत सर्वेश गोवेकर साई काणेकर, ओंकार नाडकर्णी, भाऊ वाळके, निलेश कदम, ज्ञानेश्वर येडवे, निखिल मयेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राकेश केसरकर यांनी केले. आभार सर्वेश गोवेकर यांनी मानले.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *