बांदा (प्रतिनिधी)
मुंबई येथे बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पो बांदा येथे पकडला १७ लाख १५ हजाराचा मुद्देमाल केला जप्त ; उत्पादन शुल्क इन्सुली पथकाची कारवाई
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर उत्पादन शुल्कच्या इन्सुली पथकाने बांदा येथे कारवाई केली . हा टेम्पो नवी मुंबई येथे घेऊन जात असल्याची कबुली चालकाने दिली . चालक वलेरियाने सेबिस्तीयनो ब्रगंजा ( रा . ऐरोली ) याला ताब्यात घेतले असून १७ लाख १५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
निवडणूक काळात प्रथमच ही कारवाई बांदा – सटमटवाडी येथे करण्यात आली . सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील , राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक मनोज शेवरे , मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी इन्सुली तपासणी नाका येथे भेट दिली . टेम्पो ( एमए च ४३ बीएक्स ११५४ ) तपासणीसाठी थांबविला .
गाडीची तपासणी केली असता त्यात महागड्या ब्रॅण्डची दारू असल्याचे दिसून आले . सदर दारू ही गोवा बनावटीची होती . दारू चे एकूण ५० बॉक्स आढळून आले . ही कारवाई इन्सुली तपासणी नाका भरारी पथकाने केली . अधिक तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर करीत आहेत .
