कु.वेदान्तच्या वाढदिवशी केले गेले वृक्षारोपण ; सलग नवव्या वर्षीही वक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनासाठी केला अनोखा उपक्रम

0 minutes, 0 seconds Read

आचरा–अर्जुन बापर्डेकर

कु.वेदान्तच्या वाढदिवशी केले गेले वृक्षारोपण ; सलग नवव्या वर्षीही वक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनासाठी केला अनोखा उपक्रम

निसर्गाच्या बदलत्या स्थितीला पर्यावरणाची होणारी -हास कारणीभूत असूनही विकासाच्या नावाखाली आपण हजारो झाडांची कत्तल करत आहोत. याचा परिणाम निसर्ग चक्रावर होत आहे. यामुळे पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे बनले आहे.या दृष्टीनेच कु वेदान्त बापर्डेकर च्या वाढदिवशी दरवर्षी वक्षारोपण, रोपांचे वाटप करत पर्यावरण संवर्धनासाठी बापर्डेकर कुटूंबीय खारीचा वाटा उचलत आहेत.

गुरुवारी पाच जूनला याचीच पुनरावृत्ती करत
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वेदान्त बापर्डेकरच्या नवव्या वाढदिवशी बापर्डेकर कुटुंबाकडून कणकवली येथील कोरल अपार्टमेंटच्या आवारात वृक्षारोपण केले गेले.या अनोख्या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला गेला.यावेळी सौ अंजली बापर्डेकर, दत्ता डेगवेकर,,दत्ताराम जाधव,उदय करंबेळकर, रामकृष्ण शिरवलकर,सौ सविता डेगवेकर, सुधाकर मेस्त्री, सौ शुभांगी मेस्त्री,प्रकाश राण,सौ शुभांगी शिरवलकर,सौ सुवर्णा जाधव, छोटी मुले स्वानंद करंबेळकर,रुद्धी घाडी,प्रेम पाचकुडे,दक्ष पाचकुडे,अन्वयी दळवी,यांसह कोरल अपार्टमेंटचे सदस्य उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *