कणकवली (प्रतिनिधी)
पोटतिडकीने प्रश्न मांडणारी माणसे असल्याने गावाचे प्रश्न मार्गी लागतात – तहसिलदार दीक्षांत देशपांडे
श्रीकृष्णाचे मंदीर एकात्मतेचे प्रतिक ; श्रीकृष्ण मंदिराचा कलशारोहण व श्रीकृष्ण मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा
असलदे गावात स्वतंत्र तलाठी कार्यालय व त्या सजेवर नव्याने तलाठी मिळावा , यासाठी सातत्याने पत्रकार भगवान लोके, सरपंच चंद्रकांत डामरे यांनी पाठपुरावा केला. त्यामुळेच गावात स्वतंत्र तलाठी मिळू शकला. या गावातील धाकू मयेकर हे पुराच्या पाण्यात वाहून गेले त्यावेळी भगवान लोके यांनी घेतलेली भूमिका फार महत्वाची होती, त्यामुळेच एनडीआरएफ चे पथक आम्ही आणू शकलो. त्या शोधमोहिमेतून झालेल्या जनजागृतीमुळे काही दिवसांनी मृतदेह आढळून आला . गावाच्या प्रश्नांसाठी पोटतिडकीने प्रश्न मांडणारी माणसे असल्यानेच प्रश्न मार्गी लागत आहे. श्रीकृष्णाचे मंदीर उभारत एकात्मतेचे प्रतिक आहे. सामाजिक , धार्मिक सोहळ्यांमध्ये असलेली एकजूट गावाला विकासाकडे नेणारी असल्याचे प्रतिपादन तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले.
असलदे गावठण ग्रामविकास मंडळ मुंबई व असलदे गावठण ग्रामविकास मंडळाच्यावतीने
बळीराम (आबा) परब यांच्या मार्गदर्शनाखाली असलदे गावठण सत्यधाम सभागृह येथे श्रीकृष्ण मंदिराचा कलशारोहण व श्रीकृष्ण मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमात ते बोलत होत. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके , सरपंच चंद्रकांत डामरे , मंडल अधिकारी दिलीप पाटील, संतोष नागावकर उपसरपंच सचिन परब , बळीराम परब, माजी सरपंच सुरेश लोके , संचालक शत्रुघ्न डामरे , परशुराम परब, शामराव परब , आत्माराम घाडी , मंडळ अध्यक्ष संदीप शिंदे, दौलत परब, शंकर पाटील, बाबाजी शिंदे , संतोष घाडी , मारुती घाडी , अभय परब , दिनेश शिंदे , मधुसुदन परब , तुषार घाडी , संदीप घाडी , अक्षय परब , सुरेश परब, राजू पाटील , गणेश शिंदे , सत्यवान घाडी, कोतवाल मिलींद तांबे आदींसह गावातील ग्रामस्थ व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तहसिलदार दीक्षांत देशपांडे व कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शाल , श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. तसेच मंडल अधिकारी दिलीप पाटील , सरपंच चंद्रकांत डामरे यांनी मार्गदर्शन केले.
