मिठबाव हरीबाचीवाडी येथील माजी जि.प. सदस्या वृषाली विजय लोके यांचे पडवे येथे रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे मंगळवारी रात्री दीड वाजता निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुलगे असून नातवंडे असा परिवार आहे. मिठबाव येथील श्री रामेश्वर मुक्तदार वाचनालयमध्ये त्या काही वर्षे कार्यरत होत्या. मिठबाव ग्रामपंचायत सदस्य म्हणून पंधरा वर्षे त्यांनी काम केले.जि. प सदस्या म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केले आहे.देवगड तालुका शिंदे गट तालुकाध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते अमोल लोके यांच्या त्या मातोश्री होत.