न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा कला व वाणिज्य विभागाचे बारावी परीक्षेत 100टक्के यश

0 minutes, 0 seconds Read

 

आचरा–अर्जुन बापर्डेकर

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा कला व वाणिज्य विभागाचे बारावी परीक्षेत 100टक्के यश

धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा चा बारावीच्या निकालात आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवला.कला आणि वाणिज्य विभागाचा निकाल शंभर टक्के लागत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.

प्रविष्ट सर्वच्या सर्व 40विद्यार्थी उत्तीर्ण होऊन100टक्के निकाल लागला. तर वाणिज्य विभागात प्रविष्ट सर्वच्या सर्व 71विद्यार्थी पास होउन प्रशालेचा निकाल 100टक्के लागला. कला विभागात वैष्णवी आनंद परब हिने 80.50टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळविला. तर द्वितीय गौरव अनिल लब्दे याने 74.17टक्के गुण मिळविले . तर सिद्धी शुक्राचार्य पाटणकर हिने71.33 टक्के गुण मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक प्राप्त केला .वाणिज्य विभागात मयुरेश भानजी साटम 85.50 टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम आला. द्वितीय लाजरी विश्वास पेडणेकर 84.83टक्के गुण मिळविले .तरप्रांजल प्रदिप चिंदरकर 84.50
टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे धी आचरा पीपल्स असोसिएशन चे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब मिराशी, तसेच सर्व समिती सदस्य,स्थानिक स्कूल कमेटीचे निलीमा सावंत,राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर,बाबाजी भिसळे, रघुनाथ पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक घुटूकडे यांसह सर्व शिक्षक पालक वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *