कचरा निर्मुलनात आता ॲक्वा मॅजिक ……

0 minutes, 0 seconds Read

 

मालवण (संदीप बोडवे)

कचरा निर्मुलनात आता ॲक्वा मॅजिक ……

 पर्यटन क्षेत्रात सतत निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे योग्य रित्या व्यवस्थापन करण्यासाठी देवबाग येथील ॲक्वा मॅजिक या संस्थेने पुढाकार घेतला आहे. देवबाग येथे याबाबतचे मॉडेल यशस्वी केल्यानंतर तारकर्ली आणि वायरी भूतनाथ गावात ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. आपला परिसर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सर्व पर्यटन व्यवसायिकांनी सहकार्य करावे असे आवाहन तारकर्ली पर्यटन विकास संस्था आणि पर्यटन महासंघाकडून करण्यात आले आहे. वायरी भूतनाथ येथे या संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर,तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, तारकर्ली सरपंच मृणाली मयेकर,रवींद्र खानविलकर ,केदार झाड,देवानंद लोकेगावकर, ॲक्वा मॅजिक संस्थेचे राम चोपडेकर, संदीप बोडवे, प्रभाकर वाळवे, बाळू मुंडिये, मिलिंद झाड, शाम झाड, जगदीश वेंगुर्लेकर, दर्शन वेंगुर्लेकर, राकेश कुंटे, अभय पाटकर यांसह अन्य उपस्थित होते. यावेळी बोलताना मोंडकर म्हणाले, पर्यटन क्षेत्रात सातत्याने प्लास्टिक कचरा तयार होत असतो. हा कचरा उचलण्यासाठी भंगारवाल्यांची जी साखळी होतो ती असुरक्षिती आणि अनियंत्रित होती. याला पर्याय म्हणून मार्फत नियंत्रित कर्मचारी हॉटेल व्यावसायिकांपर्यंत पोहोचणार आहेत. सहदेव साळगावकर म्हणाले, ड्रेसकोड परिधान केलेले ॲक्वा मॅजिक संस्थेचे कर्मचारी आता कचरा उचलण्यासाठी सज्ज आहेत. येथील पर्यटन क्षेत्रात प्रतिवर्षी काही लाख प्लास्टिक बाटल्यांचा तसेच अन्य प्लास्टिकचा कचरा तयार होत असतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण होत असते. आता सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने कचरा जमा केला जाणार आहे. राम चोपडेकर म्हणाले, पर्यटन क्षेत्रातील आपला गाव, परिसर आणि किनारे स्वच्छ ठेवणे आपली सर्वांचीच जबाबदारीं आहे. अनेक वेळा पर्यटक बेजबाबदारपणे रस्त्यावर, किनाऱ्यांवर पाण्याच्या आणि मद्याच्या बॉटल्स वापरून फेकून देत असतात. फेकलेल्या प्लास्टिक पिशव्यांमुळे परिसर विद्रूप दिसतो. ॲक्वा मॅजिक संस्थेच्या माध्यमातून आपला परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *