कणकवली रेल्वे स्थानक परिसर होणार लक्षवेधी ; शुक्रवार ९ ऑगस्टला लोकार्पण

0 minutes, 0 seconds Read

कणकवली दि ८ ऑगस्ट ( तुळशीदास कुडतरकर)

कणकवली रेल्वे स्थानक परिसर होणार लक्षवेधी ; शुक्रवार ९ ऑगस्टला लोकार्पण 

खासदार नारायण राणे प्रमुख उपस्थिती ; पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची प्रमुख हस्ते होणार लोकार्पण

सार्वजनिक बांधकामविभागाने जिल्ह्यातील आणखीन एक महत्वपूर्ण काम पूर्णत्वास नेले आहे. कणकवली रेल्वेस्थानकाला जोडणाऱ्या रस्त्याचे कॉक्रिटीकरण व रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे कणकवली शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. या कामाचा लोकार्पण समारंभ माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ९ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता होणार आहे.

यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार वैभव नाईक, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,जिल्हाधिकारी किशोर तावडे,कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता शरद राजभोज, अधिक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपविभागीय अधिकारी विनायक जोशी, कनिष्ठ अभियंता शुभम दुडये यांनी केले आहे. कणकवली,ओरोस,कुडाळ आणि सावंतवाडी या चार स्थानकांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.
रेल्वे स्थानकावर आल्यावर आपण विमानतळावरच आल्यासारखे वाटावे, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने पुढाकार घेण्यात आला.तसेच
कणकवली,सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानक परिसराचे विमानतळाप्रमाणे सुशोभिकरण करण्यात आले आहे. प्रवाशांना आकर्षित करतील, असे विविध प्राण्यांचे पुतळे कणकवली येथे बसविण्यात आले आहेत. सुंदर उद्यानही तयार करण्यात आले
आहे. वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली आहे.

 

सिंधुदुर्गनगरी येथेही लोकार्पण!

 

सिंधुदुर्गनगरी रेल्वेस्थानकाला जोडणाऱ्या रस्त्याचे कॉक्रिटीकरण व सुशोभिकरण कामाचा लोकार्पण समारंभही मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी दुपारी १२:०० वाजता आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता शरद राजभोज, अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपविभागीय अधिकारी विनायक जोशी, कनिष्ठ अभियंता शुभम दुडये यांनी केले आहे. कणकवली, औरौस, कुडाळ आणि सावंतवाडी या चार स्थानकांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *