कणकवली( प्रतिनिधी)
कळसुली श्री.देव स्वयंभू भोगनाथ मंदिरात २,३,४, मे रोजी महारुद्राभिषेक सोहळा !
तालुक्यातील कळसुली गावातील भोगनाथवाडी येथील श्री.देव स्वयंभू भोगनाथ मंदिर येथे वैशाख शु.षष्ठी दि. २ मे २०२५ ते वैशाख शु. अष्टमी दि. ४ मे २०२५ या दिवशी ” महारुद्राभिषेक सोहळा ” निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहेत.
२ मे रोजी सकाळी ७ ते ९ वा. परिवार देवतांना विधिवत आमंत्रण,श्री.देव स्वयंभू भोगनाथ येथे श्री.गणेश पूजन समारंभ दान विधी,सकाळी ८.३० ते ९.३० वा. श्री. देव लिंगेश्वर लघुरुद्र, श्री.देव गांगेश्वर राई येथे श्रीफळ ठेवून आमंत्रण देणे,सकाळी ९.३० ते १०.३० वा.श्री.भावई देवी अभिषेक, सकाळी १०.३० ते ११.३० वा.श्री.विठलाई देवी अभिषेक,सकाळी ११.३० ते १२.३० वा. श्री.देव नितीचे पाषाण अभिषेक, सायं. ७ वा. हरिपाठ,रात्रौ ८.३० वा. स्थानिक भजने,
३ मे रोजी सकाळी ८ ते १०.३० वा. महारुद्र जप, सकाळी ८.११ वा. देवता स्थापना व पूजन, सकाळी ११.३० ते १.३० वा. सप्तशती (नवचंडी) जप, दुपारी १.३० वा. आरती, सायं.७ वा. हरिपाठ, रात्रौ ८.३०वा. स्थानिक भजने,
४ मे रोजी सकाळी ८ ते १.३० वा.महारुद्र जप, सकाळी ८.३० ते १०. वा.ग्रहयज्ञ, सकाळी १० ते १२ वा. नवचंडी हवन,दुपारी १२ ते १.३० वा.बलिदान, कुमारी पुजन, पूर्णाहुती, अभिषेक, आरती,दुपारी १.३० नंतर महाप्रसाद, सायं. ७ वा.हरिपाठ, रात्रौ ८.३० वा.स्थानिक भजने, आदी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास सहपरिवार, मित्रमंडळीसह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.अस आवाहन श्री.देव स्वयंभू भोगनाथ मंदिर मानकरी व उत्सव मंडळ कळसुली, वतीने करण्यात आले आहे.
