बांदा (मंगल कामत) २४ जुलै २०२४
डेगवेत घराची भिंत कोसळुन दोन लाखांचे नुकसान..
डेगवे फणसवाडी येथील सुधाकर बळीराम देसाई यांच्या राहत्या घराची मातीची भिंत कोसळून दोन लाखाचे नुकसान झाले. याबाबतची माहिती माजी सरपंच मधुकर देसाई यांनी दिली. तलाठी आयरे यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे.
भिंत कोसळली त्यावेळी देसाई कुटुंबीय घरात होते, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच डेगवे सरपंच राजन देसाई, माजी सरपंच मधुकर देसाई, सोसायटी अध्यक्ष प्रवीण देसाई, उपसरपंच मंगेश देसाई, ग्रामपंचायत सदस्य जानकी देसाई यांनी पाहणी केली.
