सावंतवाडी (प्रतिनिधी)
भाजप मंडळ अध्यक्षपदी सुधीर आडीवरेकर
भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्षपदी माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांची निवड करण्यात आली आहे. बांदा व आंबोली मंडळ अध्यक्षांची निवड दोन दिवसांत जाहीर करणार असल्याची माहिती जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी दिली. युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते श्री. आडीवरेकर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
