यंगस्टारच्या कबड्डी स्पर्धेत खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावरील संघांमध्ये खेळताना दिसत आहेत. ही बाब मंडळासाठी अभिमानास्पद आहे – समीर नलावडे

0 minutes, 0 seconds Read

कणकवली( प्रतिनिधी)

यंगस्टारच्या कबड्डी स्पर्धेत खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावरील संघांमध्ये खेळताना दिसत आहेत. ही बाब मंडळासाठी अभिमानास्पद आहे – समीर नलावडे

‘यंगस्टार’च्या राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन 

कबड्डी हा लाल मातीतील खेळ आहे. या खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता यंगस्टार मित्रमंडळ गेली २८ वर्षे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे. यंगस्टराच्या कबड्डी स्पर्धेत खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावरील संघांमध्ये खेळताना दिसत आहेत. ही बाब मंडळासाठी अभिमानास्पद आहे. शहरातील युवकांना कबड्डी खेळाविषयी आवड निर्माण व्हावी, यासाठी यंगस्टार गेली कित्येक वर्षे काम करीत आहे. कणकवली शहरातून खेळाडू निर्माण होण्यासाठी यंगस्टारने पुढाकार घेतला पाहिजे. मंडळाच्या क्रीडा विषयक उपक्रमांना आपले सहकार्य राहील, अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने यंगस्टार मित्रमंडळाने प. पू. भालचंद्र महाराज संस्थान नजीक असलेल्या नगरपंचायतीच्या कीडासंकुल परिसरात राज्यस्तरीय पुरूष कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात केले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन समीर नलावडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्री. नलावडे बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, भैय्या आळवे, माजी नगरसेवक किशोर राणे, भालचंद्र पेडणेकर, पद्युम मुंज आदी उपस्थित होते.
श्री. नलावडे म्हणाले, कबड्डी खेळाला चालना मिळावी, या हेतूने यंगस्टार मित्रमंडळ गेली २८ वर्षे सातत्याने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे. मंडळाचा कबड्डी स्पर्धा आयोजित करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. शहरातील युवकांना चांगली दिशा दाखवण्याचे काम मंडळाकडून केले जात आहे. मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे.

यंगस्टाराच्या कबड्डी स्पर्धेतील खेळाडू राष्ट्रीयस्तरावर व प्रो कबड्डी लिगमध्ये खेळताना दिसत असून भविष्यात हे खेळाडू आंतरराष्ट्रीयस्तर व अाॅलिंपिकमध्ये खेळताना दिसतील. यापुढील काळात मंडळाने क्रीडा, समाजोपयोगी उपक्रम हाती घ्यावे, मंडळाच्या प्रत्येक उपक्रमाला मी सहकार्य करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली. बंडू हर्णे, अबिद नाईक यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. आरंभी समीर नलावडे यांनी फित कापून यंगस्टराच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उदघाटन केले. त्यानंतर नलावडे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक अण्णा कोदे यांनी केले. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. यावेळी कबड्डीप्रेमी उपस्थित होते.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *