सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च व इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत श्रीदत्त विद्यालय जि. प. शाळा कणकवली नं.6 चे सुयश…

0 minutes, 4 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च व इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत श्रीदत्त विद्यालय जि. प. शाळा कणकवली नं.6 चे सुयश…

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत श्रीदत्त विद्यालय जि. प .शाळा कणकवली नं. 6 च्या विद्यार्थ्यांनी यशाची उत्तुंग भरारी घेतली आहे, या परीक्षेसाठी एकूण 20 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून 50 टक्के विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत,
यामध्ये इयत्ता चौथी -पार्थ इळकर (सिल्वर मेडल), दूर्वा मेजारी- (सिल्वर मेडल), इयत्ता- तिसरी अखिल चौहान( सिल्वर मेडल), इयत्ता -दुसरी आराध्या पांढरे (सिल्वर मेडल),सान्वी शिर्के (सिल्वर मेडल) ,यज्ञेश वेंगुर्लेकर (सिल्वर मेडल), हर्षिता लाड (ब्राॅंझ मेडल), पार्थ सरकारे( ब्राॅंझ मेडल), आर्या चौहान (ब्राॅंझ मेडल), श्रेयस इळकर (ब्राॅंझ मेडल) प्राप्त झाले आहे.

तसेच इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत इयत्ता पहिली -त्रिशा कुंटे केंद्रात 2 री ,कोमल सावंत- केंद्रात 3 री, इयत्ता दुसरी – सान्वी शिर्के जिल्ह्यात 3 री, आराध्या पांढरे- केंद्रात 1 ली , यज्ञेश वेंगुर्लेकर- केंद्रात 2 रा ,इयत्ता चौथी -पार्थ इळकर -जिल्ह्यात 4 था, दूर्वा मेजारी -केंद्रात 1ली आली आहे.
विद्यार्थ्यांच्या यशाची दाद घेत, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहून बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेमार्फत स्टार बॉण्डिंग या देशभरात हाती घेण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वॉटर बॉटल देण्यात आल्या, यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या पेडणेकर, उपशिक्षिका सौ. रसिका शेटये (पानारी )तसेच पालकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वीतांचे शा.व्य.स .अध्यक्षा सौ.साक्षी आमडोसकर, केंद्रप्रमुख के. एम .पवार ,बँकेचे अधिकारी दिनेश सावंत, निखिल साटम ,सर्व व्यवस्थापन समिती सदस्य , पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले ,सर्वत्र विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *