भगवान महावीर यांची शांती अहिंसेची शिकवणुकीचे पालन केले तर विश्वशांती नांदेल – दयानंद मांगले

0 minutes, 0 seconds Read

 

खारेपाटण (उदय दुधवडकर)

भगवान महावीर यांची शांती अहिंसेची शिकवणुकीचे पालन केले तर विश्वशांती नांदेल – दयानंद मांगले

खारेपाटण येथे भगवान महावीर जन्मकल्याण सोहळा उत्साहात संपन्न!

 

जैन धर्मियांचे २४ वे तीर्थकर भगवान महावीर यांनी दिलेला दया, शांती, अहिंसेची शिकवण दिलेला संदेश प्रत्येकाने आचरणात आणला व त्या शिकवणुकीचा सर्व समाजात जागृती केली तर संपूर्ण जगात या संदेशाचे पालन होऊन सर्वत्र विश्वशांती निर्माण होईल , या विश्वशांती कल्याणासाठीच या जन्म कल्याण महोत्सवाच्या पूर्वसंध्येला जगातील १३० देशात विविध जैन संघटनांमार्फत नवकार महामंत्राचा जप करण्यात आला या नवकार महामंत्र्या जप निश्चितपणे विश्व शांतीसाठी व विश्वकल्याणासाठी होऊ शकतो या नवकार मंत्राचा सर्व जैन बांधवांनी नियमित आपल्या आचरणात आणला तर निश्चितपणे जीवनात यशस्वी होता येईल.अतिशय क्षेत्र खारेपाटण नगरीत साजरा होणारा भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव हा खारेपाटण येथील जैन समाजाने टिकविलेल्या जैन धर्म संस्कृतीचे उल्लेखनीय कार्य आहे. असे प्रतिपादन भारतीय जैन संघटना सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष दयानंद मांगले यांनी अतिशय क्षेत्र खारेपाटण या ठिकाणी आयोजित केलेल्या भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव बोलताना केले.

जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर १००८ भगवान महावीर जन्म कल्याण सोहळा अतिशय क्षेत्र खारेपाटण या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यात भगवान महावीरांचे माता बनण्याचा मान सौ. संजीवनी नागेश कासार भगवंतांची आत्या, सलोनी अनिल होनाळे, सौ, स्वप्नाली संतोष डोर्ले,पाळण्याची चार दोऱ्या होण्याचा मान सौ ईश्वरी अक्षय ब्रह्मदंडे ,सौ सायली तुषार डोर्ले,सौ कविता पवन कावळे सौ,राणी राहुल कावळे यांना मिळाला भगवंतांना काजळ घालणे मान सौ शारदा सुभाष उन्हाळकर, जन्म कल्याण जन्मकल्याण सुंठवडा वाटप करण्याचा मान सौ.संपदा निरंजन चव्हाण यांनी प्राप्त केला. भगवंतांची पूजा करण्याचा मान श्री व सौ विनोद ब्रह्मदंडे यांना मिळाला. समाजातील जेष्ठ श्रावक श्राविका यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यात पुष्पा कावळे, नीता कावळे, सुमती रायबागकर,रजनी ब्रम्हदंडे, सुमती आलते,पुष्पा कावळे,शोभा ब्रम्हदंडे, विजय डोर्ले,रमेश ब्रम्हदंडे,भिकाजी साळवी,राजाराम कावळे,रमेश ब्रम्हदंडे,सुरेंद्र बेळंके,भास्कर मांगले,प्रा.अरुण नाकील,रेखा लडगे,सुनीता उन्हाळकर,शारदा उन्हाळकर,मनोहर भडाळे,तुकाराम बिजितकर यांचा ,तसेच देवगड बँक ऑफ इंडिया अधिकारी दीपक देवलशी, जन्मकल्याण सोहळा महाप्रसाद अन्नदाते सुशीला बापु पालसे (सांगली)यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सकाळी ६ ते ७ मंगल गीते, ७. ते ७.३० ध्वजारोहण, ७.३० ते ८.३० दोन्ही मंदिरात पंचामृत अभिषेक ,९.३० ते ११.३० सवाल व ज्येष्ठांचा सत्कार त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव,यात प्रामुख्याने क्रीडा,शासकीय सेवा वैद्यकीय,शिक्षण ,पाठशाळा यात उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या विद्यार्थी व श्रावक श्राविका यांच्या यथोचित गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात राष्ट्रीय स्तर धावपटू ओम विनोद उन्हाळकर ,डॉ प्रदीप ब्रम्हदडे,(पीएचडी)डॉ.पल्लवी रविंद्र ब्रम्हदंडे,(बिडीएस),पूजा अजित ब्रम्हदंडे(एमबीबीएस) संदेश विभाकर लडगे (पोलीस सेवा)कु.संजिता रविंद्र केंगाले (दहावी प्रथम क्रमांक)याना गौरविण्यात आले. ११.३० ते १२.३० भगवान महावीर जन्मोत्सव भोजन, सायंकाळी ४ .ते ५.३०ते पालखी मिरवणूक त्यानंतर भगवंत महावीर अभिषेक, साय ७.३० संगीत आरती समारोप करून या जन्म कल्याण महोत्सवाची सांगता करण्यात आली. अतिशय क्षेत्र खारेपाटण येथील दिगंबर जैन समाजसेवा मंडळ जैन श्रावक शाखा पद्मावती महिला मंडळ यांच्या वतीने या जन्म भगवान महावीर जन्म कल्याण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राध्यापक अरुण नाकील, प्रमुख पाहुणे बँक ऑफ इंडियाचे अधिकारी दीपक देवलशी, भारतीय जैन संघटना सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष दयानंद मांगले सौ आशाताई ब्रम्हदंडे सौ दर्शना डोर्ले,उपाध्यक्ष पवन कावळे, उपाध्याय अजित पंडित उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *