बांदा येथे श्रीरामनवमी उत्साहात साजरी

0 minutes, 0 seconds Read

 

बांदा (मंगल कामत)

बांदा येथे श्रीरामनवमी उत्साहात साजरी

बांदा येथे श्रीरामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. बांद्यातील श्री विठ्ठल मंदिर,श्री बांदेश्वर मंदिर,श्री साईबाबा मठ ,संत सोहिरोबानाथ आंबिये मठ तसेच श्रीराम पंचायतन मंदिर,पानवळ येथे हा सोहळा साजरा करण्यात आला.
बांदा श्री विठ्ठल मंदिरात दुपारी ठिक १२ वाजता रामनामाच्या जयघोषात प्रभु श्रीरामाला पाळण्यात घालून झोके देण्यात आले.सर्व भाविकांनी पुष्पवृष्टी केली.त्यानंतर ढोलताशांच्या गजरात पालखी फेरी निघाली.श्री बांदेश्वर मंदिरामध्येही याच वेळेत भाविकांच्या उपस्थितीत रामन्मसोहळा होऊन श्रींची सवाद्य  पालखी फेरी निघाली. मार्गात दोन्ही पालख्यांच्या वार्षिक भेटीचा सोहळा झाला.गावातील देवतांना भेट देऊन दोन्ही पालख्या मंदिरात परतल्या.बांदा येथिल श्री साईमठ , संत सोहिरोबानाथ आंबिये मठ तसेच पानवळ येथिल श्रीरामपंचायतन मंदिर येथेही श्रीरामनवमी निमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *