खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित उद्या १० एप्रिल रोजी सायकल रॅलीची आयोजन

0 minutes, 0 seconds Read

 

देवगड (प्रतिनिधी)

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित उद्या १० एप्रिल रोजी सायकल रॅलीची आयोजन

देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत सोनचाफा कलमांचे केले जाणार वाटप

खासदार श्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, देवगड आणि इको व्हीलर ग्रुप आयोजित भव्य सायकल रॅली दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
खुला गट २५ किमी जामसंडे भारतीय जनता पार्टी कार्यालय ते तळेबाजार १२ वर्षाच्या आतील आणि महिलांसाठी ११ किमी जामसंडे भारतीय जनता पार्टी कार्यालय ते दाभोळ तिठा रॅली सकाळी ६.०० वाजता माजी आमदार अँड अजित गोगटे व बाळ खडपे यांच्या शुभहस्ते झेंडा फडकवून स्पर्धेला सुरुवात होईल.सहभागी सायकल पटूना टी शर्ट, मेडल, प्रशस्तीपत्रक मिळणार आहे.रॅली मार्गावर पाणी,अँम्ब्युलन्सची सोय असणार आहे. रॅलीसाठी हेल्मेट आवश्यक आहे. सकाळी ८ वाजता खासदार श्री. नारायण राणे यांचा वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कार्यालय मध्ये केक कापने, सकाळी ९.३० वाजता खासदार श्री. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड ग्रामीण रुग्णालयाला कपाट भेट.सकाळी १० वाजता देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीत ७४ सोनचाफा कलम वाटप. सकाळी ११ वाजता असलदे येथे दिवीजा वृद्धाश्रमला जीवनावश्यक वस्तु व काही भेटवस्तू देणार अश्याप्रकारे खासदार श्री. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड भारतीय जनता पार्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती भाजपा देवगड मंडल तालुका सरचिटणीस तथा देवगड जामसंडे नगरपंचायत नगरसेवक शरद ठुकरूल यांनी पत्रकारांना दिली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *