आचरा–अर्जुन बापर्डेकर
फणसगाव होळी उत्सवात पारंपरिक प्रथांचा होतोय जागर
होळी उत्सवामुळे फणसगाव मध्ये चाकरमान्यांची वर्दळ वाढली आहे.घरोघरी भेट देणारया पालखी अबदागिरी निशाण मुळे या भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.फणसगावच्या शिमगोत्सवाची सुरुवात होळी पौर्णिमेला देव होळी आणि गाव होळी घालून होते. धुलीवंदनाच्या दिवशी श्री देव रवळनाथ मंदिरात पालखी, मानाचे खांब, अबदागिरी, व निशाण सजवून कापड खेळे शिमग्याचा खेळ खेळत शिमग्याचा जत गायला जातो. त्यानंतर श्री देव महादेव व महालक्ष्मी मंदिरात येऊन पारंपरिक पद्धतीने अन्य देव- दैवतांना निमंत्रित करून पालखी व संपूर्ण देवाचा साज ढोल ताशांच्या गजरात चव्हाट्यावर आणला जातो. चव्हाट्यावर पालखी नाचवली जाते व त्यानंतर गाव होळीच्या समोर जत बोलून गावीक गाऱ्हाण सांगितले जाते. त्यानंतर भाविक भक्तांची गाऱ्हाणी सांगितली जातात. नवीन नवस बोलणे व बोललेले नवस फेडले जातात.यावेळी मुंबईकर चाकरमानी मंडळी ही मोठया प्रमाणात उपस्थित असतात.
