कळसुली गावात बेकायदेशीररित्या स्टोन क्रशर व क्वारी व्यवसाय जोरदार सुरु ; स्थानिकांची मागणी प्रशासनाकडून डावलण्याचे प्रकार कायम सुरुच
सामाजिक कार्यकर्ते दिगंबर वारंग यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
कळसुली गावातील स्थानिकांच्या जीवावर बेतलेले स्टोन क्रशर व क्वारी व्यवसाय कायमस्वरुपी बंद करण्याबाबत स्थानिक ग्रामस्थांमार्फत वारंवार पत्रव्यवहार, आंदोलने करुन देखील प्रशासनाच्या आशिर्वादाने, कळसुली गावामध्ये बेकायदेशीर स्टोन क्रशर व क्वारी व्यवसाय बिनधास्तपणे राजरोस सुरु असून, काही व्यवसाय धारकांचे वाणिज्य परवाने, लीज यांची मूदतसुध्दा संपत आलेली आहे. तरीसुध्दा सदरचे व्यवसाय कायमस्वरुपी बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.अशा इशारा निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते श्री. दिगंबर वारंग, यांनी दिला आहे.याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, यांना सादर केले.
कळसुली गावामध्ये सुरु असलेले स्टोन क्रशर व क्वारी व्यवसायांमुळे व कधीही क्वारीमध्ये करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंगमुळे, स्थानिक लोकांची घरे, बागायती, शेती यांचे फार मोठे नुकसान होत आहे. नागरिकांच्या घरांना तडे जाण्याचे प्रकार उद्भवले असून, फळ बागायती धोक्यात आलेल्या आहेत. मात्र याबाबत प्रशासनाकडे वारंवार मागणी करुनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे श्री.दिगंबर वारंग, यांनी नमूद केले आहे. तसेच याबाबत स्थानिक मंडळ अधिकारी, यांच्या दूर्लक्षामूळे स्टोन क्रशर व्यवसायासह, व वाहतूक पोलिस अधिकारी यांच्या दूर्लक्षामुळे भरधाव वेगासह, नियमांना बगल देवून होणारी वाहतूक करणारे डंपर कोणतीही ताडपत्री न घालता राजरोसपणे भरणाव वेगाने वाहने चालवित असल्यामूळे डंपरमधून उडणारी धूळ व खडी यांच्यामूळे सदर मार्गावरुन जाणारे सर्व वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
तरी, याबाबत येत्या १५ दिवसांत संबंधीतांवर आवश्यक कारवाई न केल्यास कळसुली ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्री. दिगंबर वारंग,यांनी निवेदनाद्वारे मा. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, यांना देण्यात आलेला आहे .