मिठबांव येथील नेपाळी युवती जिरा नरे विश्वकर्मा यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा ; शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी देवगड पोलिस निरीक्षक यांना निवेदन
मिठबांव येथील नेपाळी युवती जिरा नरे विश्वकर्मा यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा ; शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी दिले देवगड पोलिस निरीक्षक यांना निवेदन
मिठबांव येथील जिरा नरे विश्वकर्मा यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून संबंधीतावर कारवाई करण्यात यावी.यासंदर्भात देवगड तालुका शिंदे गट शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी देवगड पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, देवगड तालुक्यातील मौजे मिठबांव गोगटेतळे येथील कलम बागेतील शेत घरात 3 मार्च रोजी जिरा नरे विश्वकर्मा हिने आंबा कलम बागेतील शेतघरात छताच्या लोखंडी पाईपलाओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. त्याची खबर कलम बागेत काम करणारा कामगार करण तीच्या राहणार नेपाळ सध्या राहणार मिठबांव यांनी तक्रार आपल्या पोलीस ठाण्यात दिली. जिरा हिचा आकस्मीक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली सदरची नोंद तपास न करता आपण कुठल्या आधारे केली याचा खुलासा करण्यात यावा,जिरा नरे विश्वकर्मा होचा मृत्यू आकस्मीक मृत्यू नसून हत्या झाल्याचा दाट संशय आहे. ओढणीने गळफास लावला असे आपण म्हणत असाल तर हाताच्या ठशांची तपासणी आपण केली आहे का ? आपल्या तपसामध्ये सदरच्या मृत्यू बाबत फॉरेनसीक रिपोर्ट आपल्याकडे आहे का ?
सदरची व्यक्ती नेपाळमध्ये राहणारी असून त्या व्यक्तीचा पासपोर्ट आपल्याकडे आहे का ? अमच्याकडे उपलब्ध माहीतीनुसार जिरा नरे विश्वकर्मा हीचा आकस्मीक मृत्यू नसून हत्या करण्यात आलेली आहे. याबाबत आपल्या स्तरावरसखोल तपास करण्यात यावा. संबंधीत मुलीचे कुणाकुणाशी संबंध होते रात्री 2 ते 4 च्या दरम्याने जिरा हीला कोण भेटायला यायचे याबाबतची सखोल चौकशी व्हावी. सदरचे प्रकरण आर्थीक व्यवहाराशी देवाण घेवाण करून अपल्या दप्तरी आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.आपल्यास्तरावर सदरच्या हत्येबाबतचा योग्य तपास करण्यात न आल्यास आम्ही वरीष्ठ पातळीवर सदर प्रकरणाच्या चौकशी बाबत दाद मागणार आहोत याची नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन दिले आहे.