
मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी आरोपी मिहीर शाहला अटक करण्यात आलीय. वरळी पोलिसांनी त्याला शहापूरमधून अटक केल्याची माहिती समोर आलीय. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये मिहिर शाहला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला रात्री उशिरा पोलिसांनी अठक केली. मिहीर शाह याच्यासह १२ जणांना ताब्यात घेतलंय. सायबर पोलिसांचं मोठं यश आहे. मिहीर शाहला लूकआऊट नोटीस बजावली होती. मिहीर शहाने अपघातानंतर पलायन केलं. मिहीर शहाला जेरबंद करण्यात यश आलंय. एकाच वेळेस ठाणे पोलिस आणि ग्रामीण पोलीस आणि शहापूर पोलिसांनी एकत्रित ही कारवाई केलीय.
