कणकवली दि ३० जुलै ( तुळशीदास कुडतरकर)
कांचन विलास खानोलकर यांना अभिनय गुणवत्ता पारितोषिक ; राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयामार्फत आयोजित करण्यात आली होती स्पर्धा
कणकवली तालुक्यातील कु. कांचन विलास खानोलकर यांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव आयोजित ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अभिनय गुणवत्ता पारितोषिक प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत आयोजित करण्यात आलेल्या ६२ व्या मराठी हौशी राज नाट्य स्पर्धेत वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान ने सादर केलेल्या ‘कृष्णकिनार’ या नाटकात कांचन ने राधा हे पात्र साकारले होते.आपल्या उत्कृष्ट अभिनया मुळे या भुमिकेसाठी तीला अभिनय गुणवत्ता हे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
गेली अनेक वर्षे ती नाट्य क्षेत्रात अभिनेत्री दिग्दर्शक अशा विविध भुमिकेतून कार्यरत असुन अनेक एकांकिका आणि नाटकात भुमिका केलेल्या आहेत. नाट्य अभिनयाचे बाळकडू तिचे वडिल आणि प्रसिद्ध अभिनेते, मालवणी कवी, विलास खानोलकर यांचेकडून मिळालेले आहे. तिच्या या यशाबद्दल तीचे अभिनंदन करण्यात येत आहे.
