आचरा (अर्जुन बापर्डेकर)
ऐतिहासिक भगवंतगड किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा जल्लोष…!
मोठ्या गटात जान्हवी परब, बाल गटात गार्गी मुणगेकर प्रथम ; चिंदर सेवा संघ आयोजित कथाकथन स्पर्धा
ऐतिहासिक भगवंतगड किल्ल्यावर चिंदर सेवा संघ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज्यांची 395 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. भगवंतगड शाळे पासून भगवंत गड किल्ल्यावरील सिद्धेश्वर मंदिरात पर्यंत जय भवानी जय शिवाजीच्या गजरात आज शिवजयंती उत्सवाची सुरुवात झाली. सिद्धेश्वराची, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला जनता विद्या मंदिर त्रिंबकच्या माजी मुख्याध्यापिका सौ. हेमांगी खोत, चिंदर सेवा संघ अध्यक्ष प्रकाश मेस्त्री तसेच चिंदर केंद्राचे माजी केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सौ. हेमांगी खोत यांचा सरपंच स्वरा पालकर, प्रसाद चिंदरकर यांचा अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांच्या हस्ते तर राजेंद्र प्रसाद गाड यांचा खजिनदार गणेश गोगटे यांच्या हस्ते शाल, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, इतर मान्यवर यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
