माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत शिवजयंती उत्साहात साजरी

 

कणकवली ( प्रतिनिधी)

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत शिवजयंती उत्साहात साजरी

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई, ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नावलौकिक शिक्षण संस्था असून या संस्थेच्या माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे वार- बुधवार, दिनांक- १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रशालेचे पर्यवेक्षक सन्मा. श्री. बयाजी बुराण सर यांच्या शुभहस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व प्रतिमेला वंदन व पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रशालेत शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांनी शिवराय, जिजाऊ व मावळे यांच्या पेहरावात वेशभूषा व शिव जन्मोत्सव “बाळ शिवाजी पाळणा” सादर करत कार्यक्रमाची सुरुवात केली. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती पी. एल. हाटले मॅडम यांनी केले तर श्री. प्रसाद मसुरकर सर यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यकर्त्याचा जाज्वल्य इतिहास विद्यार्थ्यांच्या मस्तकात उतरविला. श्रीमान योगी, छावा यासारख्या पुस्तकांचा परामर्श विद्यार्थ्यांना दिला. शिवाजी महाराजांविषयी ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तके कादंबऱ्या, कथा, कविता, पोवाडे व संदर्भ ग्रंथ हे विद्यार्थ्यांनी वाचन करावीत तेव्हा शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आपणास समजेल. आजच्या तरुण वर्गाला शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज व आवश्यकता आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यानंतर प्रशालेतील काही निवडक विद्यार्थ्यांनी उत्तम व दर्जेदार मनोगते सादर केली.

या नंतर प्रशालेपासून ते ग्रामपंचायत भिरवंडे अशी सहा किलोमीटर अंतराची पदयात्रा विद्यार्थी व शिक्षकांनी काढली. या पदयात्रेत ग्रामपंचायत भिरवंडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महारांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. यावेळी श्री. बुवा सतीश सावंत यांच्या कन्येने शिवगितांचे सुमधुर आवाजात सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधून मने जिंकली. सर्व वातावरण शिवमय झाले. खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे भिरवंडे मराठा समाज मुंबईचे अध्यक्ष सन्मा. श्री. यशवंत सावंत, भिरवंडे गावचे सरपंच श्री. नितीन सावंत सर्व ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सरते शेवटी सर्वांना खाऊ वाटप करण्यात आले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. प्रसाद मसुरकर सर व आभार श्री. कोरडे बी.डी.यांनी केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *