शिवडाव माध्यमिक विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी ; ग्लोबल फाउंडेशन यांच्यामार्फत शाळेत नेत्र तपासणी शिबिर

 

 

कणकवली ( प्रतिनिधी)

शिवडाव माध्यमिक विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी ; ग्लोबल फाउंडेशन यांच्यामार्फत शाळेत नेत्र तपासणी शिबिर

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवडाव माध्यमिक विद्यालयात खूप मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सुरुवातीला शिवरायांच्या प्रतिमेसह गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी झांजपथक, लाठीकाठी यांची प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणामुळे परिसर दुमदुमून गेला.

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आपले विचार आपल्या भाषणातून व्यक्त केले. पोवाडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित गाणी आणि विविध प्रकारचे नृत्य सादर करण्यात आले .

शाळेतील सर्व विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेमध्ये उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ग्लोबल फाउंडेशन यांच्यामार्फत आज शाळेत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वृंद या सर्वांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली .आजच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी शाळेच्या शालेय समितीच्या अध्यक्षा दळवी मॅडम तसेच ग्लोबल फाउंडेशनचे देसाई सर, परब सर उपस्थित होते.

आज शाळेचे संस्थापक अध्यक्ष तवटे साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या कन्या सौ छाया व त्यांचे जावई श्री राजेश सर उपस्थित होते.दळवी मॅडम, मुख्याध्यापक पवार सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेत राबवण्यात आलेल्या या शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे ग्रामस्थ तसेच पाहुणे या सर्वांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया मडव, तनुज गावकर आणि श्रेया पवार यांनी केले पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक पवार सर यांनी केले तसेच आभार डॉ. के आर पाटील यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील तवटे सर, वरपे सर, पाताडे मॅडम, कदम मॅडम तांबे सर यांनी परिश्रम घेतले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *