कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टस प्रशालेमध्ये सन्माननीय कै. ज. तु. दळवी यांची जयंती साजरी

0 minutes, 1 second Read

कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टस प्रशालेमध्ये सन्माननीय कै. ज. तु. दळवी यांची जयंती साजरी

 

कणकवली दि २७ जुलै (प्रतिनिधी)

कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टस च्या भव्य सभागृहामध्ये २५ जुलै रोजी कै. ज.तु. दळवी यांची जयंती साजरी करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. प्रकाश दळवी – माजी स्कूल कमिटी सेक्रेटरी ,प्रमुख उपस्थितामध्ये श्री. के.आर. दळवी स्कूल कमिटी चेअरमन, मुख्याध्यापक श्री.वगरे व्ही.व्ही ,श्री.बाबाजी मूरकर-शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष,श्री. पांडुरंग सावंत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, श्री.रामचंद्र सावंत(शिक्षक पालक संघ सदस्य).श्री राजाराम चव्हाण (शिक्षक पालक संघ सदस्य).सौ.मानसी दळवी- शाळा व्यवस्थापन समिती सदस्या, ज्येष्ठ शिक्षक श्री.सावळ एस. के. समस्त ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकामध्ये श्री.वगरे व्ही व्ही. यांनी कै.ज.तु. दळवींच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या अथक परिश्रमाची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली.
तसेच कै.ज.तु.दळवींच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असे मत व्यक्त केले.

प्रमुख उपस्थितीतामध्ये बोलताना श्री.के.आर. दळवी यांनी ज.तु. दळवींच्या विविध गतस्मृतींना उजाळा दिला आणि त्यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर चित्रीत केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे,या हेतूने कळसुली इंग्लिश स्कूलची स्थापना जतु दादांनी अनेक मान्यवरांच्या सहकार्यातून केली. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा,असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

अध्यक्षीय भाषणात श्री.प्रकाश दळवी गुरुजी यांनी कै.ज. तु. दादांसोबत काम करताना आलेले अनुभव, त्यांच्या आठवणी त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. मिळालेल्या संधीचे सोने करा.मिळालेले काम हे जरी मनासारखे नसेल तरी मन लावून काम करा त्यात तुमची प्रगती नक्की होईल.मोठे व्हा ज.तु.दादांचा आदर्श घेऊन भविष्यात यशाची शिखरे सर करा,असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कळसुली शिक्षण संघ मुंबईचे अध्यक्ष श्री.पुरूषोत्तम दळवी, कार्याध्यक्ष श्री.सुर्यकांत दळवी, सरचिटणीस श्री.विजय सावंत तसेच सर्व पदाधिकारी यांनी कै. ज तु. दळवी दादांना अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात झालेल्या वक्तृत्व स्पर्धामध्ये प्राथमिक गट इयत्ता पाचवी ते सातवी यामध्ये प्रथम क्रमांक कु. रिया राहुल कासले (पूर्ण प्राथमिक शाळा तळवडे), द्वितीय क्रमांक कु.लावण्या महेंद्र कदम तर तृतीय क्रमांक कु.देवयानी दिपक राणे हिने पटकावला माध्यमिक गटात प्रथम क्रमांक कु.मंदार मोती वरक, द्वितीय क्रमांक कु.वेदिका रघुनाथ मेस्त्री, तर तृतीय क्रमांक कु.मेघा प्रवीण दळवी हिने पटकावला, तर उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक कु.रसिका नंदन गावकर द्वितीय क्रमांक कु.श्रुतिका प्रमोद नाईक तर तृतीय क्रमांक कु.प्राची महेश देसाई या विद्यार्थीनीने प्राप्त केला.या स्पर्धेत सुमारे 48 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता यशस्वी विद्यार्थ्यांबरोबरच स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक प्रशालेचे मुख्याध्यापक, संस्था पदाधिकारी ,शिक्षक व शिक्षकेतर वृंद पालक, ग्रामस्थ इत्यादी वर्गातून केले गेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री.आनंद सावंत यांनी मानले.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *