कणकवली उपजिल्हा रुग्णालयात तीन तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती; आरोग्यसेवा होणार अधिक सक्षम

0 minutes, 0 seconds Read

 

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या नियुक्तीला वेग 

कणकवली (प्रतिनिधी)

 

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात तीन तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून त्यामुळे तालुक्यातील आरोग्यसेवेला मोठा दिलासा मिळणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

उपजिल्हा रुग्णालयात डॉ. नेहा बीडकर (एम.एस. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र – जी.एम.सी., मिरज), डॉ. शुभम बोडके (एम.एस. सामान्य शस्त्रक्रिया – जी.एम.सी., औरंगाबाद) आणि डॉ. विश्वजीत मांडे (एम.डी. त्वचारोग – जी.एम.सी., नागपूर) यांची नियुक्ती झाली आहे.

या तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्तीमुळे कणकवली व परिसरातील नागरिकांना आता स्त्रीरोग, शस्त्रक्रिया तसेच त्वचारोगाशी संबंधित उपचार स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी होणार असून आरोग्यसेवा अधिक सुदृढ आणि प्रभावी होण्यास मदत होणार आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार उपजिल्हा रुग्णालयाला हे तज्ज्ञ अधिकारी प्राप्त झाल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना योग्य आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉक्टर पंकज पाटील यांनी व्यक्त केली आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *