देवगड तालुक्यात ठीकठिकाणी शिवभक्तांनी केली शिवजयंती साजरी
देवगड तालुक्यात बुधवारी देवगड तालुका मराठा समाज, जामसंडे येथील युवा विकास प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. देवगड व जामसंडे शहरातील रिक्षा चालकांच्यावतीने भव्य रॅली काढण्यात आली होती. तर शिवसेना कार्यालय येथे नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली.
देवगड मराठा समाजाच्यावतीने इंद्रप्रस्थ हॉल येथे शिवजयंती कार्यक्रम पार पडला. यावेळी समाजाचे निशिकांत साटम, सौ. शर्मिला साटम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि महाआरती करण्यात आली. यावेळी समाजाचे अध्यक्ष संदीप साटम, मंगेश लोके, सचिव केदार सावंत, अविनाश सावंत, शेखर गोळवणकर, दयानंद पाटील, किसन सूर्यवंशी, तुषार पाळेकर, शंकर पाटील, किरण पाटील, काका राऊत, संजय तारकर, शशांक सकपाळ, चिन्मय खानविलकर, योगेश राणे आदी उपस्थित होते. देवगड तालुका मराठा समाजाच्यावतीने देवगड किल्ला गणपती मंदिरापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली होती. तसेच सायंकाळी विविध स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. देवगड शिवसेना कार्यालयातही शिवजयंतीनिमित्त नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
देवगड व जामसंडे शहरातील रिक्षा चालकांनीही जामसंडे दिर्बादेवी स्टॉप ते देवगड किल्ल्यापर्यंत भव्य रॅली काढली. त्यांचे देवगड किल्ला येथील श्री गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष नंदकुमार घाटे यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष शिवराम निकम, गुरु वाडेकर, प्रवीण गोळवणकर, बाप्पा माने, अमोल वाडेकर, हेमंत तोरस्कर, उल्हास मणचेकर, अशोक गोळवणकर, केदार तेली, केदार वाडेकर, मंगेश फाटक आदी उपस्थित होते. ‘मिळून सारे’ देवगड यांच्यावतीनेही देवगड किल्ला येथील श्री गणेश मंदिरनजीक शिवजयंती उत्सव पार पडला.
सायंकाळी श्री दिर्बादेवी मंदिर – जामसंडे ते देवगड किल्ला गणेश मंदिरपर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर किल्ला येथील गणेश मंदिर येथे पोवाडा गायन, सातारा येथील राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे प्रा. विक्रम कदम यांचे शिवव्याख्यान पार पडले.