माध्यमिक विद्यामंदिर, कनेडी येथे दहावी बोर्ड परीक्षा बैठक व्यवस्था

 

 

कणकवली ( प्रतिनिधी)

माध्यमिक विद्यामंदिर, कनेडी येथे दहावी बोर्ड परीक्षा बैठक व्यवस्था

    दहावी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा येथील माध्यमिक विद्यामंदिर कनेडी ता. कणकवली (८६०३ ) या केंद्रावर २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. कनेडी केंद्रावर कनेडी हायस्कूल, कुंभवडे हायस्कूल, नाटळ हायस्कूल, नरडवे हायस्कूल, हरकुळ बुद्रुक, हरकुळ उर्दु शाळा, शिवडाव हायस्कूल, जांभवडे हायस्कूल या सर्व शाळेतील विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. या विद्यार्थ्यांचे केंद्रावर बैठक क्रमांक B०२४९९९ ते B०२५२९२ असे असून यामध्ये मराठी माध्यमाचे ११४ विद्यार्थी, सेमी इंग्रजी १५३ विद्यार्थी, इंग्रजी माध्यम ०९ विद्यार्थी व उर्दू माध्यमाचे १९ विद्यार्थी असे एकूण २९५ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा बैठक व्यवस्था इमारत क्रमांक दोन व तीन अशी करण्यात आली आहे. वर्ग खोल्यांची संख्या दिव्यांग विद्यार्थ्यांसह तेरा करण्यात आली आहे. या परीक्षा काळात सर्व विद्यार्थ्यांनी पेपर सुरू होण्यापूर्वी (४५ मिनिटे) पाऊण तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर रहावे असे आवाहन परीक्षा केंद्र (८६०३) संचालक माध्यमिक विद्यामंदिर कनेडी. श्री. सुमंत दळवी यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *